रुग्णवाहिकांची तातडीने संख्या वाढवा

चाळीतील बाधित नागरिकांना कोरोन्टीन साठी प्राधान्य द्या

विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी यांची मागणी

ठाणे : ठाणे शहरात कोरोना आजाराने कहर केला आहे. रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी तासनतास त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे मनपाने तातडीने रुग्णवाहिकेसंदर्भात उपाययोजना करावी अशी मागणी ठाणे मनपा विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी केली आहे. तसेच कोरोन्टीन सेंटर मध्ये चाळीतील नागरिकांना प्राधान्य द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
ठाणे मनपा क्षेत्रात दररोज अंदाजे १५०च्या घरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. रुग्णवाहिके अभावी त्यांची हेळसांड होत आहे. त्यांना त्या साठी तासनतास ताटकळत उभे राहायला भाग पडत आहे. ठाणे मनपा विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी या विरोधात आवाज उठवला आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
कोरोना ची लक्षणें किंवा इतर बाबत त्याला घरी कोरोन्टीन केले जाते. मात्र चाळ आणि इमारत यात फरक आहे. इमारतीतील लोक नैसर्गिक विधी घरी करतात मात्र चाळीतील नागरिक सार्वजनिक ठिकाणी जातात, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. अशा नागरिकांना प्रधान्याने पालिकेने ठरवलेल्या ठिकाणी कोरोन्टीन करावे अशी सूचना प्रमिला केणी यांनी केली आहे.

 362 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.