कलावंतासाठी अनुदान व आर्थिक मदत मिळावी

कलावंतासाठी अनुदान व आर्थिक मदत मिळावी

 डोंबिवलीतील निवेदक प्रविण गायकवाड (शिवा) यांची मागणी  मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

 डोंबिवली : लॉकडाऊन मध्ये सर्वांचे हाल होत असताना अश्या बिकट परिस्थितीत राज्य सरकारने यावर ठोस पाउले उचलली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.अश्या परिस्थितीत  कलावंत आणि निवेदकांनाहि त्रास सहन करावा लागत आहे.  म्हणूनच कलावंतासाठी अनुदान व आर्थिक मदत मिळावी अशी मागणी डोंबिवलीतील निवेदक प्रविण गायकवाड (शिवा) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
 निवेदनात निवेदक प्रविण गायकवाड (शिवा) यांनी म्हटले आहे कि, आम्ही सध्या  जगभरात कोरोनाच्या महामारीने विळखा घातला आहे.तसेच जगभरातील लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील कामकाज बंद आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.तशातच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची तर अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.सर्वात जास्त वाईट अवस्था ही स्टेज कलाकारांची झाली आहे.केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करुन पैसा कमविणारे हे कलाकार ठराविक हंगामातच कार्यक्रम सादर करतात.मग तो हंगाम जानेवारी महीन्यापासुन ते जुन महिन्याच्या सुरवातीपर्यंत असतो. लग्नसराई,सत्यनारायण पुजा,सामाजिक मंडळाचे कार्यक्रम,महापुरुषांच्या जयंती महोत्सवातुन कार्यक्रम सादर करुन मिळालेल्या पैश्यातुनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात व संपुर्ण पावसाळा घरीच बसावे लागते.पावसाळासंपे पर्यंत जो काही पैसा कमावलेला असतो तोही संपलेला असतो.त्यातच अनेक कलाकार भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात.घर भाडे,विज बिल,दव्याचा खर्च,मुलांच्या शाळेचा खर्च,ईतर आजार बाजार सांभाळणे खुप कठीण जाते."सर्व सोंग आणु शकतात पण पैश्याचे सोंग आणता येत नाही. कोरोनाच्या महामारीत अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत,पण तेही फक्त धान्य पुरवठा करत आहेत. कीती दिवस पुरतो हा धान्य पुरवठा ?अनेक कलावंतांचे रेशन कार्डही नाहीत,सरकार मार्फत रेशनवर तांदुळ  मिळते, मग फक्त तांदळावर माणूस जगेल काय? इतर खर्चासाठी कलाकाराने पैसा कुठुन आणायचा ? हा मोठा प्रश्न आज कलाकारांना व त्याच्या कुटुंबाला पडला आहे.आज ह्या कलाकारांमध्ये गायक,गायिका,वादक,नृत्य कलाकार,सावुंड लाईट्स ईंजिनीयर,व इतर स्टेज कलाकार आहेत. ह्या सर्वांची अवस्था सध्याच्या परिस्थितीत खुप दयनीय व बिकट झाली आहे. आज जर कलाकार जगला तर आपली संस्कृती आपली परंपरा टिकुन राहील. अन्यथा आपली संस्कृती व परंपरा लोप पावेल. ह्या देशाचा अभिमान सर्व भारतीयांना आहेच. पण राज्यशासन व केंद्र शासनाला कलाकारांचा अभिमानही तेवढाच पाहीजे. कारण कलाकार आपल्या संस्कृतीचं,आपल्या परंपरेच दर्शन आपल्या कलेच्या माध्यमातुन संपुर्ण जगाला घडवतो.माझी राज्य शासनाला व केंद्र शासनाला कळकळीची विनंती आहे की कलाकाराच्या ह्या अवस्थेला लक्षात घेवुन लॉकडाऊन  संपेपर्यंत कलाकारांना आर्थिक मदत करण्यात यावी.

 437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.