पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला अशीही मानवंदना

चेतन राऊत यांनी पुश पिनच्या साहाय्याने साकारले शिंदे यांचे पोट्रेट

ठाणे : ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. ठाणे जिल्ह्यातील आकडा देखील रोजच पुढे सरकत आहे. अशा प्रसंगी राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावल्यागत जिल्हाभर फिरून अधिकाऱ्यांसोबत कोरोनाला आळा घालण्यासाठी काम करत आहेत. गरजूंना अत्यावश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा मिळवून देत आहेत. त्यांच्या या कामाला सलाम करण्यासाठी त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी जागतिक पातळीवरचे कलाकार चेतन राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे ३८८८ पुश पिन पासून २४ इंच x १८ इंच आकाराचे पोर्ट्रेट साकारले आहे.

 478 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.