आता सरकारने राज्यातील भूमिपुत्रांना त्यांच्या जिल्ह्यात सोडावे

ठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे मुखमंत्र्यांना साकडे

ठाणे : राज्याच्या इतर जिल्ह्यातून मुंबईत काही कारणास्तव आल्यावर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या भूमिपुत्रांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याची तयार राज्य सरकारने केली खरी पण, राज्यातून पायी चालत जाणाऱ्या परराज्यातील मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी राज्य सरकारने सर्वप्रथम प्राधान्य दिले. नुकत्याच ४ थ्या लॉकडाऊनची घोषणाही झाल्याने राज्याच्या इतर जिल्ह्यातील अडकून पडलेल्या राज्यातील भूमिपुत्रांना आपले सरकार कधी सोडणार ?असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या भूमिपुत्रांना ही गावची ओढ लागली आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना लवकरात लवकर सोडा अशी ठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे
देशभरात २२ मार्चपासून आजपर्यंत ४ था लॉकडाऊन सुरू झाला. हा लॉकडाऊन कालावधी ३१ मेपर्यंत वाढवला असताना राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या श्रमिकाकरिता कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.त्यामुळे ते ही आता परराज्यातील मजुरांप्रमाणे पायी निघण्याच्या तयारी आहे. एकीकडे यापूर्वी श्रमिकांना सोडण्याची राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली होती, परंतु काही तासातच त्या घोषणेतबदल करून महाराष्ट्रात परराज्यातील अडकलेला कामगार वर्गासाठी त्या- त्या राज्यातील सीमेवर सोडण्यासाठी एस.टी.च्या माध्यमातून मोफत सोडणार असल्याची घोषणा केली व राज्यातील विविध जिल्ह्यातील अडकलेल्या कामगारांची लवकरच १७ तारखेपर्यंत योग्य निर्णय घेऊ असे सांगितले होते. परंतु आपण ४ थ्या लाॅकडाउनची घोषणा केली. त्यांना दोन उलटले तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यात अडकलेल्या श्रमिकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. एकीकडे परराज्यातील कामगारांना मोफतची सोय त्वरित घोषित करीत असताना महाराष्ट्र विविध जिल्ह्यातील अडकलेल्या लोकासाठी कोणतीही तरतूद न करणे म्हणजे सगळ्या गावाला जेवण पण घरचा उपाशीच अशी परिस्थिती दिसत आहे.
वास्तविक महाराष्ट्र राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी सुखरूप सोडणे हि आपल्या सरकारची नैतिक जबाबदारी असल्याने महाराष्ट्र सरकारने त्वरित मोफत एस.टी.सेवा उपलब्ध करून दयावी अशी मागणी जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे केली आहे.

 478 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.