८ वी ते १२ वीच्या वर्गांसाठी ‘गोप्रेप’ ची लाइव्ह ऑनलाइन कोचिंग सुविधा

संपूर्ण तयारीसाठी मोफत ऑनलाइन क्लासेस, तत्काळ शंका निरसन आणि शिस्तबद्ध अभ्यासक्रम

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी ग्रेडअपने गोप्रेप अॅप सुरु करण्याची घोषणा केली आहे. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीचे शालेय तयारीचे अॅप विद्यार्थ्यांच्या जेईई व नीट तयारीसह इतर शैक्षणिक गरजांची पूर्तता करेल. लॉकडाउनमुळे शाळांनी नवे सत्र सुरू केले नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दोन महिन्यातील विषयांवर फ्री लाइव्ह क्लासेस सुरु करण्यावर ब्रँडचे लक्ष आहे.

अॅपच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मोफत लाइव्ह ऑनलाइन क्लासेस तसेच दिवसानुसार, रचनाबद्ध अभ्यासाच्या पद्धतीनुसार आखलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याचा पर्याय यांचा समावेश आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना घर न सोडता या क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षकांकडून शिकण्याची संधी मिळेल. या अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पारदर्शकता येण्यासाठी तसेच उत्तरे मिळवण्याच्या सहज आणि अखंड प्रक्रियेसाठी तसेच त्वरीत शंका निवारणासाठी विद्यार्थी फोटोही अपलोड करू शकतात. के१२ विभागात जेईई आणि नीटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना गोप्रेपच्या प्रभावी परीक्षांचीही तयारी करण्याची परवानगी असेल. जेणेकरून त्यांच्या शिकण्याचा निकालावर चांगला परिणाम होईल.

गोप्रेपचे संस्थापक विभू भूषण म्हणाले, ‘शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सध्याच्या विशिष्ट परिस्थितीत शिकण्याच्या आणि परीक्षा तयारीच्या प्रवासात मदत करण्याचा आमचा उद्देश आहे. कॉलेजनंतरच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी ही शाळेतील तयारीपेक्षा वेगळी असते. यासंबंधीच्या निर्णयप्रक्रियेत पालकांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे त्यात वेळेच्या गुंतवणुकीचीही मोठी गरज आहे. हे सर्व घटक लक्षात ठेवता कंपनीने गोप्रेप अॅप लाँच केले असून शालेय विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यावर आमचा भर असेल.’

 445 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.