वांगणी मध्ये अर्सेनिक अल्बम औषधांचे वितरण

नागरिकांच्या संरक्षणार्थ अविरत लढणाऱ्या कोविड योद्ध्यांची काळजी घेण्यासाठी औषधांचे वितरण

बदलापूर : कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत असल्याचे आयुष मंत्रालय, दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. त्या अनुषंगाने या औषधाचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या संरक्षणार्थ अविरत लढणाऱ्या कोविड योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, या पवित्र भावनेने प्रेरित होऊन बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत वांगणीचे सर्व कर्मचारी, वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत युवराज प्रवीण गिध यांच्या सहकार्याने आर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वितरण सोमवार, (ता.१८) रोजी ग्रामपंचायत कार्यालय वांगणी येथे करण्यात आले.
यावेळी किशोर शेलार, बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप निगडे, ग्रामपंचायत वांगणीचे सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मनोहर देवरे यांनी सदरील औषधाचा उपयोग व वापर कशा प्रकारे करावा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच औषधाचा बाजारात तुटवडा असतानाही अगदी कमी वेळात औषधें उपलब्ध करून दिल्याबद्दल मे. लासा सुपरजेनेरिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ओमकार हेर्लेकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

 500 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.