औद्योगिक विभागातील सुमारे २० रासायनिक कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

कारखाने जाणीवपूर्वक बंद करण्याचा डाव असल्याचा उद्योजकांचा आरोप

डोंबिवली : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून हजारो नव्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे मात्र डोंबिवली औद्योगिक विभागातील २० कारखान्यांना कारणे दाखवा ,बंद करा आशा नोटिसा बजावण्यात आल्या असून रासायनिक कारखाने जाणीवपूर्वक बंद करण्याचा डाव असल्याचे उद्योजक बोलत आहेत.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय कल्याण व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सुमारे २० कारखान्यांना नोटीस देऊन त्रुटी दूर करेपर्यंत बदचा बडगा उभारला आहे अनेक कंपन्यांनी त्रुटी दूर केल्याचा अहवाल देऊनही त्यांना कंपनी सुरू करण्यास परवानगी देत नाही तुम्ही वर जा असे मोघम सांगण्यात येत आहे. सध्या लोकडवूनमुळे सर्व व्यवहार ठप्प असताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने काही कंपन्यांना बंदची नोटीस दिली आहे कल्याण शील रस्त्यावरील “अलंकेमि लॅबोरेतीज ” ही ५० वर्षे जुनी नावाजलेली कंपनी असून मध्यतरी या कंपनीत आग लागली होती. तेव्हापासून विविध प्रकारे त्यांना नोटीस देण्यात आली व आता तर कंपनी कायम बंद करण्याची नोटीस दिली. त्यांनी सर्व त्रुटी दूर केल्या तरी त्यांना कंपनी सुरू करण्यास परवानगी दिली जात नाही. पदाचा गैरवापर करून रासायनिक कंपन्या बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उद्योजक बोलत आहेत. विशेष म्हणजे कंपनीला भेट न देता नोटीस देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या बरोबर इतरही छोट्या कंपन्यांना बंदची कारवाई करण्यात आली. मात्र त्याही त्रुटी दूर करून सुरू करण्यास दिल्या जात नाही. अधिकारी ज्या पद्धतीने त्रास देत आहेत, त्यामुळे काही उद्योजक कंपन्या अन्यत्र नेण्याची तयारीही करत आहेत. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कारवाई करणाऱ्या अधिकार्याविरुद्धकारवाई करण्याची मागणी केली जात आहे . यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे म्हणाले, डोंबिवलीतील काही कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस व बंदची नोटीस दिली असली तरी त्रुटी दूर केल्यावर त्या सुरू करण्यात येतील रासायनिक कंपन्या कायम बंद व्हाव्यात अशी भूमिका नाही.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.