दोन पक्षातील त्या चौघांच्या माघारीमुळे मुख्यमंत्र्यांसह ९ जण बिनविरोध

शिवसेनेच्या शिष्टाईला यश

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये या विषाणूची बाधा विधिमंडळ सदस्यांनाही होवू नये यासाठी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेतवर बिनविरोध निवडूण आले.
या निवडणूकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, त्यांच्या पक्षाच्या सदस्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती अॅड. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशीकांत शिंदे, अमोल मिटकरी तर काँग्रेसचे राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तर भाजपाकडून गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपचडे, प्रविण दटके, रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. याशिवाय रमेश कराड, सुरेश लेले या दोघांनी अर्ज भरले होते. खबरदारी म्हणून राष्ट्रवादीच्या इतर दोन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र आज १४ मे रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपाच्या डॉ.गोपचडे आणि लेले या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेले रमेश राठोड यांच्यासह चार जण बिनविरोध निवडूण आले. तर राष्ट्रवादीच्या किरण पावस्कर आणि शिवाजीराव गर्जे या दोन डमी उमेदवारांनीही आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे या ९ ही जागा बिनविरोध निवडल्या गेल्याची माहिती विधिमंडळाकडून जाहीर करण्यात आले.
या निवडणूकीत काँग्रेसने मोदी यांनाउमेदवारी देत रिंगणात उभे केले होते. मात्र शिवसेनेकडून काँग्रेसशी चर्चा करून अतिरिक्त उभारण्यात आलेला १० उमेदवार मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाल्याने शिवसेनेच्या शिष्टाईला यश आल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

 578 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.