डिजिटल शेती व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे अॅग्रीबाजार

निर्बंधांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन विकण्यावर भर

मुंबई : अॅग्रीबाजार या भारतातील प्रमुख ऑनलाइन अॅग्री ट्रेडिंग कंपनीने, कोव्हिड-१९ च्या लॉकडाउन काळात कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शुल्क न आकारण्याची घोषणा केली आहे. शेतीच्या मालाची साखळी विस्कळीत होऊ नये तसेच शेतीत उत्पन्न झालेला माल वाया जाऊ नये, याची सुनिश्चिती करण्यासाठी ही मर्यादित काळासाठीची ऑफर देण्यात आली आहे. शारीरिक अंतर राखत खरेदीदार आणि विक्रत्यांची सांगड घातली जाते.

लहान शेतमालक जे लॉकडाउनमधील निर्बंधांमुळे त्यांचे उत्पादन विकू शकत नाहीत, जवळपासचे बाजारही बंद आहेत, लॉजिस्टिक अडचणी आहेत, त्यांना या सुविधेचा फायदा होत आहे. एप्रिल २०२० मध्ये अॅग्रीबाजार डॉटकॉम अॅपने फळे, भाज्या, धान्य, तेलबिया आणि डाळींसारख्या शेती उत्पादनाच्या ८००० ट्रकद्वारे अगदी लडाख, सिक्कीम, लक्षद्वीपसारख्या दुर्गम भागातही यशस्वीरित्या सुविधा दिली. बारामतीतील द्राक्ष उत्पादकांपासून काश्मीरमधील सफरचंद उत्पादकांपर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा इद्याददी राज्यातील शेतकऱ्यांचा लॉकडाउनमध्ये मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा ठरला.

अॅग्रीबाजारचे सह संस्थापक आणि सीईओ अमित अग्रवाल म्हणाले, ‘कोव्हिड-१९च्या काळात भारतीय शेतीने आतापर्यंतचे मोठे आव्हान पेलले आहे. तथापि, अशा कठीण काळातही सरकार व स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न तसेच भारतीय शेतक-याच्या डिजिटल प्रवासामुळे दिलासा मिळाला आहे. कोव्हिड-१९ च्या काळात आमच्या मंचावर शेतक-यांना नि:शुल्क नोंदणी देण्याच्या सुविधेमागे एकच उद्देश आहे. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दो गज की दूरी’ या आवाहनाला प्रतिसाद देत सध्याच्या निर्बंधांमध्ये शेतक-यांचे उत्पादन विकणे होय.’

 414 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.