श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ?

७० वर्षांतील विविध घोटाळ्यांत जनतेच्या लुटलेल्या ४ लाख ८२ हजार कोटी रुपयांचा हिशेब काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई : हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ज्या काँग्रेस पक्षाने भारताला सेक्युलर घोषित करून अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना आणि हाज यात्रा, इफ्तार, मौलानांचे वेतन यांच्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले, एक रुपयाही कुठल्या मंदिराला दिला नाही, तसेच प्रभु श्रीराम काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले; रामसेतू नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, असे सांगून रामसेतु तोडण्याचे षड्यंत्र आखले होते, त्या हिंदुविरोधी काँग्रेसला हिंदूंच्या मंदिराशी काही देणे-घेणे नसून केवळ मंदिरांतील धन आणि सोन्यावर त्यांचा डोळा आहे. मागील ७० वर्षे देशात काँग्रेसची सत्ता असतांना बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड, 2-जी, कॉमनवेल्थ खेळ, अशा अनेक घोटाळ्यांत जनतेचे ४ लाख ८२ हजार कोटी रुपये लूटल्याचे आकडेवारी सांगते. या भ्रष्टाचाराची, काळ्या धनाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी का केली जात नाही ? मंदिरांतील सोने घेण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेचे लुटलेले हे धन अगोदर परत करावे. हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र स्वरूपात विरोध केला जाईल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे.
भारतात संरक्षण आणि रेल्वे मंत्रालयानंतर सर्वाधिक जमिनीचे मालक चर्च संस्था आहे. त्यानंतर सुमारे ७ लाख एकर जमिनीचा मालक वक्फ बोर्ड आहे. अजमेर दर्गा आणि निजामुद्दीन दर्गा येथे कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा होतो. काँग्रेसचे नेते त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची मागणी करणार आहेत का ?
आज ‘एफ्.सी.आर्.ए.’च्या माध्यमातून विदेशातून हजारो करोड रुपयांचे धन भारतातील सामाजिक आणि धार्मिक संस्थांना येत आहे. आम्ही एप्रिल महिन्यात सरकारला पत्र पाठवून हे सर्व धन कोरोना आपत्तीत लढण्यासाठी वापरण्याची विनंती केली आहे.
आज देश भीषण परिस्थितीमध्ये असतांना आमच्या मंदिरांनी सर्वांत मोठे काम केलेले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी तिजोरीत कोट्यवधी रुपयांचे धन मंदिरांनी दिलेले आहे. तसेच मंदिरांत भाविकांनी येणे बंद केलेले असतांनाही लाखो लोकांसाठी विनामूल्य अन्नदान चालवले जात आहे. हे सर्व मंदिरांतून चालू असतांना चर्च आणि मशिदी यांना काही न बोलता, हिंदु मंदिरांतील सोन्यावर डोळा ठेवून काँग्रेसने त्याचा हिंदुविरोध स्पष्ट केला आहे. काँग्रेसला आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की, जर मंदिरांचे धन किंवा सोने घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल.

 430 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.