‘कुटलूट’ देणार मुंबईत अत्यावश्यक वस्तूंची घरपोच सेवा

ग्राहकांना ७२ तासांच्या आत ताजी फळे आणि भाजी पोहोचवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांशीही हात मिळवला आहे.

मुंबई: मुंबईमध्ये ग्राहकांना अत्यावश्यक सामानाची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी कुटलूटने पुढाकार घेतला आहे. ग्राहकांच्या अत्यावश्यक गरजा पुरवण्यासाठी या सोशल कॉमर्स मंचाद्वारे सध्या फळे, किराणा सामान, औषधे आणि आरोग्य, वैयक्तिक काळजीच्या वस्तू अशा अत्यावश्यक वस्तू सरकारच्या मार्गदर्शक नियमांनुसार पुरवल्या जात आहेत. या ब्रँडने इंडसफ्रेशसारख्या कंपन्यांशी भागीदारी केली असून ग्राहकांना ७२ तासांच्या आत ताजी फळे आणि भाजी पोहोचवण्यासाठी स्थानिक शेतक-यांशीही हातमिळवणी केली आहे.

जास्तीत जास्त सुरक्षितेची हमी घेण्यासाठी, या मंचाद्वारे विनासंपर्क वस्तू पोहोचवल्या जातात. डिलिव्हरी देणारी व्यक्ती सोशल डिस्टान्सिंगचे नियम पाळत दाराजवळ संबंधित वस्तूंचे पाकिट ठेवतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व वस्तू घेतल्या जातात, त्यांचे निर्जंतूकिकरण केले जाते, नंतर त्या पॅक करून डिलिव्हरी करण्यासाठी बॉक्समध्ये पॅक केल्या जातात.

कुटलूटचे सह संस्थापक जस्मीत थिंड यांनी सांगितले की, ‘या महामारीत एकत्र येत एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. आमच्या हायपरलोकल डिलिव्हरी सेवेतच अधिक विस्तार करत, इंडसफ्रेश आणि स्थानिक शेतक-यांशी केलेल्या हातमिळवणीद्वारे ग्राहकांना सुलभतेचा आणि सुरक्षिततेचा अनुभव मिळेल. तसेच आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सनाही या कठीण काळात उत्पन्न मिळेल.’

 608 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.