खो-खोच्या वाढीत महाराष्ट्रचा सिंहाचा वाटा – डॉ. चंद्रजित जाधव

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा

परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या वतीने ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या कार्यशाळेत सुरवातीला मुंबई उपनगरच्या प्रशांत पाटणकर यांनी खो-खोचे नियम व कौशल्य यावर झालेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना विविध सहभागी शिबीरार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन समाधानी केले. त्यानंतर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा यांनी सर्व मार्गदर्शकांचे व श्री शिवाजी महाविद्यालय तसेच त्याच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मांनापासून आभार व्यक्त केले.

त्यानंतर भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव उस्मानाबादचे डॉ. चंद्रजित जाधव यांनी खो-खोचा आढावा घेताना खो-खोच्या प्रचार-प्रसार व वाढीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले. खो-खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाताना मतीतून मॅटवर जावे लागत असल्याचे नमूद केले. मातीतील व मॅटवरील खो-खो खेळताना वेगवेगळ्या तंत्राचा वापर करावा लागत असल्याचे नमूद करताना या दोन्ही प्रकारात होणार्‍या इजा सुध्दा वेगवेगळ्या असून त्यावर त्यासंबधित उपचाराची गरज असल्याचे नमूद केल. मॅटवरील खो-खोत सुधारणा करताना वेगवेगळ्या जाडीच्या मॅट या खो-खोचा वेग, सुर मारणे, स्प्रिंट आदीचा विचार करून उपयोगात आणले जात असल्याचेही संगितले. त्यामुळे येत्या काही काळात मॅट व खेळाडूंचे बूट यात कमालीचा बदल होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. खो खोचा विविध देशांत प्रसार होताना महाराष्ट्र हिरीरीने सहभागी होत असल्याचेही त्यांनी संगितले. ज्यावेळी मॅट सहज उपलब्द होत नव्हते त्यावेळी अजित पवार यांनी सरकार कडून सर्व जिल्ह्यांना मॅट उपलब्द करून दिल्याची आठवणहि करून दिली. तसेच त्यांनी श्री शिवाजी महाविद्यालय व सर्व मार्गदर्शकांचे मांनापासून आभार व्यक्त केले.

ही ऑनलाइन कार्यशाळा अतिशय उत्तम रित्या पार पडावी यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. संतोष कोकिळ, डॉ. संतोष सावंत, डॉ. सुनील मोडक, सुशील इंगोले व पवन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.