लढवय्या परिचारिकांना मंत्री पाटील यांनी मानले बहिण

जागतिक परिचारिका दिनी जयंत पाटील यांचे भावनिक पत्र

मुंबई : कोरोनाच्या संकटात आपण सैनिक म्हणून सर्वांच्या पुढे राहून लढत आहात. प्रत्येकाकडून जीवन जगण्यासाठी कोणती ना कोणती नोकरी करत असतो. मात्र जी नोकरीही असते आणि समाजाची सेवाही असते. तुम्ही करत असलेली नोकरी ही समाज सेवेचा भाग आहे. तुमच्या या अतुलनीय कामामुळे मी तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहणार असल्याची आपुलकीची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जागतिक परिचारिका दिना सर्व परिचारिकांना पत्र लिहित भावनिक साद घातली.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिचारिकांना लिहिले आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून डॉक्टरांसह परिचारिकाही अहोरात्र कोरोनाशी झुंज देत आहे. या संपूर्ण यंत्रणेचे मनोबल वाढवे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या संकटकाळात लढणाऱ्या परिचारिकांना भावनिक पत्र लिहिले आहे.
परिचारिका म्हणून काम करणार्‍या माझ्या सर्व माता भगिनींना, सविनय नमस्कार! करत जयंत पाटील यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
जगात प्रत्येक व्यक्ती आर्थिक प्राप्तीसाठी काही ना काही काम करत असते, पण खूप कमी कामे अशी असतात जी नोकरी देखील असते आणि समाजाची सेवा देखील. परिचारिका म्हणून नोकरी हा त्या सेवेचाच भाग आहे.
आज सारे जग Covid – १९ सारख्या अत्यंत गंभीर युद्धात लढत आहेत आणि या युद्धात सैनिक मात्र तुम्ही सार्‍या परिचारिका आहात. या लढाईचे नेतृत्व देखील तुमच्याकडेच आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही समाजाची सेवा करत आहात याची आम्हा सगळ्यांना पूर्ण जाणीव आहे. तुमच्या मेहनतीमुळेच हे संपूर्ण जग Covid-१९ च्या या अत्यंत वाईट अशा काळातून बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सार्‍या काळात तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबियांची जरूर काळजी घ्या अशी विनंतीही जयंत पाटील यांनी शेवटी पत्रात केली आहे.

 329 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.