कोरोना काळात उपेक्षितांसाठी मदतीचा ओघ

स्थलांतरित मजुरांसह तृतीयपंथी, ग्रामीण कलाकारांच्या मदतीसाठी ९० कोटी रुपये खर्च करणार

ठाणे : संपूर्ण जग अजूनही कोविडच्या प्रभावाखाली झाकोळलेले आहे, अशा परिस्थितीत मजूर तसेच हातावर पोट असणार्‍या अनेक मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील अनेक लोकांची परवड होत आहे. याचीच दखल घेत मिलाप संस्थेने  एका महिन्याभरात जवळपास ९० कोटींचे फंड्स जमा करण्यात यश मिळवले आहे. ही रक्कम महाराष्ट्रातील मजूर जे तसेच गुजरातमध्ये स्थलांतरित मजुरांना या मदतीचा ऊपयोग होणार आहे. तसेच एकाकी पडलेले परप्रांतीय, रोजंदारी मजदूर यांना अत्यावश्यक वस्तू आणि जेवण उपलब्ध करवून देण्यासाठी मदत करण्याबरोबरीनेच तृतीयपंथी, पुरुष वेश्या, सर्कस कलाकार, ड्रायव्हर्स, डिलिव्हरी कर्मचारी, ग्रामीण कलाकार, नर्तक आणि फ्रीलान्सर कर्मचारी यांना देखील मदत करण्यासाठी ऑनलाईन फंडिंग मोहिमा चालवल्या जात आहेत.

याबाबत मिलापचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक अनोज विश्वनाथन यांनी सांगितले, की, “या काळात प्रभावित लोकांना आपले जीवन पुन्हा उभे करण्यासाठी मदत करता आली. आर्थिक मदतीची प्राथमिक संकल्पना रोजंदारी मजदूर आणि परप्रांतीय कामगारांसाठी अन्न आणि रेशन पुरवणे ही होती.  त्यापाठोपाठ आरोग्य आणि इतर फ्रंटलाईन क्षेत्रातील व्यक्तींसाठी वैद्यकीय आणि व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे देखील फंडरेजिंग केले गेले.   इयत्ता सहावीत शिकणाऱ्या या मुलीने ७.४८ लाख रुपये जमा केले आणि रोजंदारी कामगारांना रेशनचे १२५० किट्स वाटले.  येत्या काही दिवसात अजून ५०० किट्स वाटण्याची तिची योजना आहे. सीओआरओ आणि सेंटर फॉर सिविल सोसायटीचे अध्यक्ष लुईस मिरांडा यांनी देखील मिलाप वर एक फंडरेजर (fundraiser) सुरु केले, रोजंदारी मजदुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे हा त्यांचा उद्देश आहे.  त्यांना यासाठी १.३ कोटी रुपये आवश्यक असून आजवर त्यांनी जवळपास ७०% रक्कम जमवण्यात यश मिळवले असून हजारो कामगारांच्या कुटुंबांना मदत पोहोचवण्यात आली आहे.

 392 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.