खो खो- बुध्दिचातुर्याचा व चपळाईचा खेळ – डॉ. प्रशांत ईनामदार

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा

परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या वतीने ता. ५ ते १३ मे दरम्यान ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज खो-खो खेळातील संरक्षणात्मक कौशल्ये याविषयी सांगली येथील डॉ. प्रशांत इनामदार व त्यानंतर खो-खोची शॅडो प्रॅक्टीस व खेळातील बारकावे याविषयी पुण्याच्या बिपीन पाटील यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. प्रशांत इनामदार यांनी खो-खो हा खेळ बुध्दिचातुर्याचा व चपळाईचा असल्याचे सांगितले. खो-खोच्या ७ किंवा ९ मि. प्रत्येक पाळीत दोन्ही बाजूचे खेळाडू, संरक्ष बाद न होण्यासाठी तर आक्रमक प्रत्येक क्षणाला संरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. या कमीत कमी वेळात दोन्ही संघातील २४ खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक हे सर्व एकाच वेळी थिंक टॅंकचे काम करत असतात. त्यावेळी प्रत्येक्ष क्रीडांगणात उतरलेले रक्षक ह्या वेळेत वेगवेगळे प्लान करत असतात. ते कधी एका पाठोपाठ बसलेल्या खेळाडूंच्या पाठीमागून धावताना साखळी पद्धतीने खेळतात तर कधी ३-६-९, १-४-८, १-३-६ असे धावत संरक्षण करत असतात. कधी हुलकावणी देणे, हबके देणे, चेन (साखळी) खेचणे अशाप्रकारे स्वत:चे संरक्षण करताना मैदानावर दिसतात. तर त्याचवेळी आक्रमक त्याला सहज स्पर्शाने, पायाच्या टाचेला धावत स्पर्श करत टॅप करण्याचा तर काही वेळा वर उल्लेख केल्याप्रमाणे स्तंभात किंवा सूर मारून बाद करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी एका खेळाडूचा पाठलाग चालू असताना अचानक हल्ला प्रकारात दुसऱ्या खेळाडूला बाद करण्याचा यशस्वी प्रयत्न मैदानावर पहायला मिळतात. त्यामुळेच प्रत्येक पाळीत होणारा आक्रमणाचा किंवा संरक्षणाचा खेळ यातील थरार अनुभवण्यातील मजा काही औरच असते.

नुकतेच मनसेने शॅडो मंत्रिमंडळची निवड केल्याचे एकले असेलच. त्याप्रमाणे खो-खोची शॅडो प्रॅक्टीस काशी करावी याबद्दल पुण्याच्या बिपीन पाटील यांनी विस्तृतपणे स्पष्ट केले. सरावा दरम्यान प्रत्यक्ष सामना सुरू असल्याचे लक्षात घेऊन त्यप्रमाणे सराव करताना ३-६-९, १-४-८, १-३-६ आशा प्रकारे साकळीत धावणे, रिग मारणे तसेच खेळातील विविध बारकावे याबद्दल भरपूर मार्गदर्शन त्यांनी केले.

 451 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.