सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

उमेद फाउंडेशन मार्फत विनामूल्य( ईम्युनिटी बुस्टरचे डोस) होमिओपॅथीच्या गोळ्यांचे प्रभाग क्रमांक २२मध्ये काम करणाऱ्या १७५ सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना दिल्या

ठाणे : आपल्या शहरावर पर्यायाने संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट उभे राहिल्याने राष्ट्रीय आपत्ती ओढावली आहे याकाळात या संकटावर मात करण्यासाठी जे योद्धे काम करत आहेत त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्यांचे स्वास्थ उत्तम राहण्याकरिता उमेद फाउंडेशन मार्फत विनामूल्य( ईम्युनिटी बुस्टरचे डोस) होमिओपॅथीच्या गोळ्या प्रभाग क्रमांक २२मध्ये काम करणाऱ्या १७५ सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांकरिता सामाजिक अंतर( social distancing) ठेवून देण्यात आल्या.त्यावेळी उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश मधुकर कोळी यांनी डॉ.अनघा महाजन आणि डॉ मयूर महाजन या दाम्पत्यांचे आभार मानले सदर उपक्रमात त्यांनी सहकार्य केले.आतापर्यंत डॉ. महाजन यांनी संपूर्ण ठाणे शहरात कोरोना विरुद्ध लढणाऱ्या सर्व घटकांना ७५०० डोसचे वाटप विनामूल्य केले आहे

 618 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.