मुंबई आणि ठाणे शहरात राहणारे अनेक मजूर वाहनांची व्यवस्था होत नसल्याने चालतच आपल्या गावाकडे निघाले आहेत.
ठाणे : वाहनांची व्यवस्था होत नसल्याने परराज्यातील अनेक मजूर चक्क पायपीट करीत आपले गाव गाठत आहेत. या मजुरांची खाण्या-पिण्याची प्रचंड अबाळ होत आहे. या मजुरांसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुरेंद्र उपाध्याय आणि ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष तिवारी यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली.
मुंबई आणि ठाणे शहरात राहणारे अनेक मजूर वाहनांची व्यवस्था होत नसल्याने चालतच आपल्या गावाकडे निघाले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने मुंबई-ठाण्यात राहून त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे हे लोक आपल्या मूळगावी निघाले आहेत. गाठीशी पैसे नसल्याने या मजुरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या मजुरांना रस्त्यामध्ये जेवणही मिळत नसल्याने गलितगात्र झालेल्या या मजुरांना गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुरेंद्र उपाध्याय आणि ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष तिवारी यांनी कापूरबाडी उड्डाणपुलाखाली वडापाव, चहा, पाणी यांची व्यवस्था करुन दिली. नाशिक हायवेने जाणार्या प्रत्येक मजुराची आस्थेवाईकपणे चौकशी करुन उपाध्याय आणि तिवारी यांनी त्यांना खाऊ-पिऊ घातले. शिवाय, त्यांना पुढील प्रवासात त्रास होऊ नये, यासाठी शिदोरीदेखील बांधून दिली.
484 total views, 1 views today