संचार बंदीच्या संकटात : कृषी विभाग, बळीराजा साथ साथ
बदलापूर : कोरोना संचार बंदीच्या संकट काळात शासनाचे कृषी विभाग आणि बळीराजा साथ साथ आहे. शेतकरी आपले काम अखंडपणे रात्रंदिवस करीत आहेत. बळीराजाचचे अथक प्रयत्न आणि परिश्रम आणि त्यांना शासनाच्या कृषी विभागाची अद्ययावत यंत्रणेची साथ या मुळे संचार बंदी असूनही आपल्या सर्वांना वेळेवर भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य उपलब्ध होत आहे. अंबरनाथ तालुक्यातील कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक चित्रफित तयार करून ती समाज माध्यमांवर प्रसारित करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. बळीराजाच्या प्रयत्नांना आणि परिश्रमांना साथ मिळत आहे ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाची, कृषी विभागाचे सर्वच कर्मचारी १००% उपस्थिती देऊन कोरोना संकटात बळीराजाला भक्कम साथ देत आहेत. अंंबरनाथ तालुका कृषी अधिकारी सुवर्णा माळी यांच्यासह अंबरनाथ तालुक्यातील कृषी विभागातील सर्वच कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.
या काळात अंबरनाथ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकवला जात आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी कशी घ्यावी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असलेली खते बी-बियाणे व बदलत्या मोसमानुसार काय काय उपाय योजना कराव्यात आदी सर्व माहिती वेळोवेळी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अंबरनाथ तालुक्यातील कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक चित्रफित तयार करून ती समाज माध्यमांवर प्रसारित करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. अंबरनाथ तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भात शेतीबरोबरच अन्य पिके घेण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा पावसाळा वेळेवर येण्याची भविष्यवाणी वर्तविण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात येत असून शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक साहित्य बी बियाणे आदी पुरविण्यासाठी कृषी विभाग बांधील असल्याचे कृषी अधिकारी सुवर्णा माळी यांनी सांगितले.
476 total views, 2 views today