राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

शिधावाटप अधिकारी टी. आर.पवार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.

बदलापूर : बदलापूर मध्ये वाढणारी कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी म्हणून राष्ट्रवादीचे महाराष्ट्र चिटणीस कालिदास देशमुख यांनी रेशनिंग अधिकारी यांच्याशी संपर्क करून बदलापूर शहरातील एकूण ३५ दुकानदाराना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अन्नधान्य पुरवठा करताना रेशनिंग दुकानातून कमी दरात आणि काही ठिकाणी मोफत धान्य पुरवठा केला जातो. दुकानदाराने ते शासनाने दिलेल्या आदेशानुसार वाटप करायचे असते. धान्य वाटप करताना असंख्य नागरिकांशी संपर्क होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिधावाटप दुकानातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर व मास्क आवश्यक असल्याने त्यांना हे साहित्य राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे शिधावाटप अधिकारी टी. आर.पवार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांचे समवेत अनीशा खान, पप्पू भोईर, लक्ष्मण फूलोरे, सुधीर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 607 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.