सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही गरिबांसाठी कोविड -१९वर मोफत उपचार सुरू

                             

निःशुल्क हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन

ठाणे : होरायझन प्राईम हाॅस्पीटलपाठोपाठ आता सफायर आणि वेदांत हाॅस्पीटलमध्येही ठाणे महापालिका क्षेत्रातील कोव्हीड १९ बाधित गरीब गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा आज पासून सुरू करण्यात आली आहे.
शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना कोव्हीड – १९ घोषित केलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते याच पार्श्वभूमीवर पिवळे केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरीकांना हॉरिजॉन प्राईम हॉस्पिटलमध्ये याधीच मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आले असून आता सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या रुग्णालयात गरजू व वंचितांना मोफत
कोविड -१९ उपचार मोफत दिले जाणार आहेत. शहरातील कोव्हीड बाधित गरीब नागरिकांना सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दाखल केले जाणार आहे. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण सर्व रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नि:शुल्क हेल्पलाईन नंबर 14555 / 1800111565 – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, 155388 / 18002332200 – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक माहितीसाठी ०२२ – २५३३३२२२या क्रमांकावर तर वेदांत हाॅस्पीटलसाठी ०२२-२५९८८०००/०३, ९८९२५०७७०० या संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 484 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.