महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राबवला उपक्रम
ठाणे : उत्तर भारतीय नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष तिवारी यांच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडत आहेत. गाठीशी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अंबिका नगर, जयभवानी नगर आदी भागात नाका कामगार, कचरा वेचक आणि असंघटीत कामगारांची संख्या मोठी आहे. रोजगार नसल्याने त्यांची उपासमार होण्याची वेळ आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर संतोष तिवारी यांनी या भागात जाऊन प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले.
514 total views, 1 views today