ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : बुधवारी चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या घटनेतून बॉलीवूड सावरत नाही. तोच मागील तीन दशकांपासून प्रत्येक नव्या अभिनेत्रीचा हिरो म्हणून राहीलेले ऋषी कपूर यांचे आज सकाळी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या विशेष म्हणजे त्यांनाही काल संध्याकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोच सकाळी त्यांची प्राण ज्योत मालवली.
त्यांना कॅन्सर झाल्याने गेल्या वर्षी अमेरिकेत त्यांच्या उपचार करण्यात आले होते. त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्यांना दोन-वेळा रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र आज तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा दाखल करण्यात मात्र त्यांच्यावर आजाराने मात केली.
साधारणत: ७० च्या दशकात मेरा नाम जोकर या चित्रपटात आपल्याच वडीलांच्या अर्थात स्व.राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ८० च्या तरूणपणात बॉबी चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये अधिकृतरित्या पर्दापण झाले. त्यावेळी त्यांची पहिली नवी अभिनेत्री होती, डिंपल कपाडीया आणि त्यानंतर जवळपास त्यांच्या अनेक चित्रपटाची नायिका ही नवीच असायची. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू सिंग यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले. याशिवाय राखी, पुनम धिल्लो, अनिता राज, पद्मीनी कोल्हापूरे, बिंदीया गोस्वामी, सुलक्षणा पंडीत, श्रीदेवी या नामवंत अभिनेत्रीचे नायक म्हणून त्यांनी काम केले. ९० च्या दशकात स्व. दिव्या भारती, मिनाक्षी शेषाद्री, माधुरी दिक्षीत-नेने, जुही चावला आणि २००० मध्ये मनिषा कोईराला, झेबा अख्तर, अश्वीनी भावे या अभिनेत्रींचे नायक म्हणून त्यांनी काम केले. याशिवाय अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले.
त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे चांदणी, हिना, प्रेमरोग, दामिनी आदी चित्रपटातील भूमिका दमदार होत्या. याशिवाय अग्नीपथ या चित्रपटाच्या रिमेक मध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिकेचे चांगलेच स्वागत झाले होते. याशिवाय एका अंडरवर्ल्ड डॉनवर आधारीत डी-डे या चित्रपटातील त्यांची महत्वपूर्ण भूमिकेची चर्चाही झाली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत स्व.इरफान खान आणि अर्जून रामपाल यांचीही भूमिका होत्या.
ऋषी कपूर यांना त्यांच्या खाजगी जीवनात चिंटू म्हणून म्हटले जात असत. अनेक अभिनेत्री खाजगीत चिंटू म्हणायच्या. याशिवाय अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन, शशी कपूर, गुंफी पेंटल, संजय दत्त यांच्यासोबत सहकारी असलेले चित्रपट विशेष गाजले.
त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा बॉलीवूडवर शोककळा पसरली असून अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांनी त्यांना ट्विटरवरून आदरांजली वाहीली
619 total views, 1 views today