शिवसैनिकांची परप्रांतीय कामगाराला मदत

बिहारमधील कामगार गेले महिनाभर कोपरी विभागात अडकून पडले आहेत

ठाणे : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचार बंदी आणली आहे त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी लॉकडाऊन पूर्ण देशभर जाहीर केले. लोकडाऊन चा फटका परप्रातीयांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.त्याचीच एक प्रचिती आली आहे ठाण्यातील कोपरी परिसरातून. कोपरीतील पारशीवाडी परिसरात बिहारचे परप्रांतीय कर्मचारी गेल्या महिन्यापासून अन्नधान्य विना अडकून होते . लोकडाऊनमूळे त्यांना बाहेर पडण्याची काहीही सोय झाली नाही म्हणून त्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी धान्य पोहोचवून मदत केली आहे .

दोन आठवड्यापूर्वी बांद्रा आणि मुंब्रा येथे त्यांच्या गावी जाण्यासाठी म्हणून रेल्वे सुरु करण्यात आली आहे अशी अफवा पसरवण्यात आली होती आणि त्यामुळे पंतप्रतियांनी मोठ्या प्रमाणात बांद्रा रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती त्यावेळी उद्धव जी ने त्या सर्व परप्रांतीय बांधवांची जबाबदारी घेतली होती.ठाण्यातील कोपरी परिसरात पारशीवाडी येथे हरिवंश चौधरी हे आपल्या परिवारासोबत नव्याने राहिला आले आहेत आणि थोड्यादिवसातच लोकडाऊन जाहीर झाले त्यामुळे स्थानिकांशी चौधरी यांचा जास्त परिचय नाही आणि धान्य पण संपत आले होते. म्हणून चौधरी यांनी त्यांच्या गावचे आमदार सरोज यादव ( आर. जे. डी पक्ष) यांच्याशी भ्रमणध्वनी करून संपर्क साधला आणि त्यांची व्यथा सांगितली .आमदार सरोज यादव यांनी त्वरित मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे कडे मदत मागितली. उद्धवजींच्या आदेशानंतर कोपरी पाचपाखाडीचे युवा सेनेचे समन्वयक दीपक झाडे यांनी त्यांचे सहकारी लाला गुप्ता यांच्याकडे धान्याची मदत पाठवली.मदत मिळाल्यानंतर हरिवंश चौधरी यांनी दीपक झाडे तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ जी शिंदे यांचे आभार मानले.

 1,414 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.