स्वत:ची गाडी आहे ? मग उद्याच भेटा


मूळ गावी, परराज्यात- परदेशात जायचं …. तहसीलदाराकडून आदेश जारी

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक स्वत:चा जिल्हा, गाव आणि राज्य सोडून इतररत्र आडकले आहेत. अशा नागरिकांना आता आपल्या मूळ गावी किंवा राज्यात परतण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. कुडाळमध्ये अशा अडकलेल्या व्यक्तींनी सरकारने दिलेल्या फॉर्मेटमघ्ये उद्या २८ एप्रिल रोजी संध्याकाळी प्रत्यक्ष कार्यालयात येवून अर्ज सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक परप्रांतीय कामगार, किंवा घरगुती धार्मिक कार्यासाठी किंवा इतर अन्य कामासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा पर राज्यातून महाराष्ट्रात आलेले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने प्रत्येकाला अडचणीचा सामना करून सरकारी शिबीरात किंवा इतरत्र रहावे लागत आहे. अशा नागरिकांना विषेशत: परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार, बिहार सरकार आणि राजस्थान सरकारशी सातत्याने संपर्क करत आहे. मात्र त्यास अद्याप केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली नाही.
यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने या गोष्टीसाठी पुढाकार घेतला असून ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहे, अशा व्यक्तींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा परराज्यातील त्यांच्या मूळ गावी जायचे असेल तर अशांसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३ मे नंतर जर लॉकडाऊन वाढला तर अशा पध्दतीने परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्याची जबाबदारी तालुक्याच्या गटविकास अधिकारी, तहसीलदारांवर सोपविली आहे.

 987 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.