डोंबिवलीतील श्री सिद्धीविनायक मित्र मंडळाचा गरजूंना मदतीचा हात..

डोंबिवली : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे.त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे अतोनात हाल होत आहे.अश्यावेळी त्यांच्या मदतीला अनेक समाजिक संस्था धावुन येतात.डोंबिवली डोंबिवली पश्चिमेकडील  गावदेवी जवळील   श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाने  सुमारे ३५० गरजू कुटुंबाना कमीत कमी  २ ते  ३ दिवस पुरेल इतके तांदूळ, डाळ आणि कांदे  वाटप केले.मंडळाने  ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाहीत आणि शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही अश्यांना प्राधान्य दिले.डोंबिवली पश्चिम विभागातील गावदेवी, मोठागाव, नवापाडा, गरिबाचा वाडा, जुनी डोंबिवली व इतर काही विभागातील झोपडपट्टी ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी   वाटप केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही संस्थेची किंवा पक्षाची मदत न घेता कार्यकर्त्यांनी स्वतः पैसे जमवून ही मदत केली आहे.  वाढता लॉकडाउन पाहता मंडळाने पुढील काळात ही अशीच मदत करण्याचे ठरवले आहे. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाने सर्व इतर मोठ्या मंडळांनाही आवाहन केले आहे की  आहे की अशा महामारीच्या संकट समयी आपण ही आपले पुढील वर्षीचे धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रम कमी खर्चात करण्याचे ठरवून गोर गरिबांना मदतीचा हात पुढे करावा.

 444 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.