रक्ताचा होणारा तुटवडा कमी करण्यासाठी आयोजित केले होते शिबिर
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आस्था फाऊंडेशन व भारतीय जनता पार्टी, घोडबंदर मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे.यामुळे रुग्णालयात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेऊन ठाण्यातील आस्था फाऊंडेशन व भारतीय जनता पार्टी, घोडबंदर मंडळ यांच्या वतीने व घोडबंदर मंडळ अध्यक्ष तन्मय भोईर यांच्या पुढाकाराने बाळकूम येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात करण्यात आले होते.या शिबिराला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.या शिबिराला कळवा हॉस्पिटलचे डॉ वानखेडे याचे विशेष सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बळीराम वासुदेव भोईर, संजय भारत पाटिल, विजय पाटील, हेमंत म्हात्रे, सुधीर कुलकर्णी, तुषार नाईक, रवी पल, रवी रेड्डी, कैलास म्हात्रे, राजेश देशमुख सुनील भोईर अशोक भोईर,आदींचे सहकार्य लाभले
648 total views, 1 views today