बदलापुरात कोरोना बाधितांची संख्या २० वर

यशस्वी उपचारांनंतर दोन रुग्ण आपल्या घरी परतले

बदलापूर : बदलापूर शहरातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. शहरात नव्याने मिळालेल्या एका रुग्णाचा स्रोत मिळत नसल्याने हा समूह संसर्गाचा प्रकार असल्याचे बोलले जाते. एकीकडे गेल्या दोन दिवसात चार नव्या रूग्णांची भर पडली आहे तर दुसरीकडे मुंबई येथील रूग्णालयातील करोनाबाधित दोघे कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत. घरी परतलेल्या दोघं रुग्णांचे रविवारी दुपारी शहरात जंगी स्वागत करण्यात आले.

मुंबईत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ये जा करणाऱ्या सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांमधील काही कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यातील दोन सफाई कर्मचारी उपचार घेत बरे होऊन बदलापुरात परतले. दुपारी बदलापूर बस स्थानकात शिवसेना शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुढे रमेशवाडी येथील त्यांच्या घरीही त्यांचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आणि टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. दुसरीकडे बदलापूर पश्चिमेत रविवादी एका रूग्णाची नोंद झाली. खाजगी औषध कंपनीत सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्याची चाचणी कंपनीतच घेण्यात आली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मात्र सुदैवाने त्यांच्या कुटुंबायांची चाचणी मात्र नकारात्मक आली. सोमवारी बदलापुरात आणखी तीन रूग्ण वाढले. दोन मुंबई महापालिका कर्मचारी असून एक खाजगी कंपनीत कामाला आहे. यातील दोघांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात उपचार सुरू असून एक विलगीकरण कक्षात होते. त्यामुळे बदलापूरातील रूग्णसंख्या २० वर पोहोचली असून सध्या १६ रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बदलापुर शहरात आढळलेल्या एकूण ३ रुग्णांपैकी एक रुग्ण खाजगी कंपनीत कार्यरत असून तो गेल्या १५ मार्चपासून घरातच असल्याचे कळते आहे. मात्र या काळात तो शहरातील ३दवाखान्यात उपचारासाठी फिरल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे शहरातील 2 नामांकित रुग्णालये आणि एका रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग बंद करण्यात येणार असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे.

 497 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.