मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी
नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
ठाणे : कोव्हीड १९ चा वाढता फैलाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून काही रुग्णालये कोव्हीड १९ च्या उपचाराकरीता निश्चीत करण्यात आलेली आहेत. तसेच या रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्ण व संशयित रुग्ण अशी वर्गवारी करुन यानुसारच नागरिकांनी उपचारासाठी गेल्यास इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. तसेच रुगणालये कोव्हीड व नॉन कोव्हीड रुग्णांसाठी स्वतंत्र घोषीत करुन दिली आहेत, या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ठाणे पालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी महापालिकेने ठाण्यातील रुग्णालये घोषीत करुन त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
कोव्हीड रुग्णालये :
५० वर्षापेक्षा कमी वय असलेले, माईल्ड कॅटेगरीमधील Asymptomatic आणि Co-morbid नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण यांनी १) भाईंदरपाडा – डी विंग, २) सफायर हॉस्पीटल, खारेगांव कळवा, ३) हॉटेल लेरिडा आणि ४) हॉटेल जिंजर येथे तर सिम्टोमॅटीक/क्रिटीकल पॉझिटिव्ह रुग्णांसाठी यांनी १) सिव्हील हॉस्पीटल, ठाणे, २) होरायझन प्राईम, पातलीपाडा, ठाणे, ३) कौशल्य हॉस्पीटल, पाचपाखाडी, ४) वेदांत हॉस्पीटल, घोडबंदर रोड येथे तर कोव्हीड सदृश्य संशयित रुग्ण यांनी बेथनी हॉस्पीटल येथे उपचारासाठी संपर्क साधावा.
फिव्हर ओपीडी रुग्णालये :
तसेच नियमित सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास या आजारांच्या निदानासाठी महापालिकेने विभागवार आरोग्य केंद्राची फिव्हर ओपीडी घोषीत केली आहेत. तरी सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास आदी कोव्हीड सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी १) कौसा आरोग्य केंद्र, ठामपा, ठाणे, २) दिवा, ठामपा, ठाणे, ३) शिळ आरोग्य केंद्र, ४) कळवा आरोग्य केंद्र, ५) उथळसर आरोग्य केंद्र, ६) किसननगर आरोग्य केंद्र, ७) मानपाडा आरोग्य केंद्र, ८) नौपाडा आरोग्य केंद्र, ९) वर्तकनगर आरोग्य केंद्र, १०) काजूवाडी आरोग्य केंद्र, ११) कोपरी आरोग्य केंद्र, १२) रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, १३) गांधीनगर आरोग्य केंद्र, १४) लोकमान्य आरोग्य केंद्र, १५) आतकोनेश्वर आरोग्य केंद्र १६) कामगार कल्याण केंद्र, १७) लोकमान्यनगर समाज मंदीर १८) शास्त्रीनगर आरोग्य केंद्र, १९) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ४९/९३ रेतीबंदर १, २०) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ७७/१२४ मुंब्रादेवी रोड, २१) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ७५/७६/११८,मुंब्रा मार्केट, २२) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक १२३/७८,अचानकनगर, २३) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ३१/ १०९/११७ /१४/१०४/ ९६/९९/१०८,शिम्ला पार्क, २४) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक १३, शिम्ला पार्क २५) हनुमान मंदीर कौसा, जुनागाव येथे संपर्क साधावा तसेच या व्यतिरिक्त ठाण्यातील २६) बेथनी हॉस्पीटल (नवीन इमारत), २७) बिलाल हॉस्पीटल, २८) मेट्रो हॉस्पीटल, २९) परम हॉस्पीटल, ३०) रेहमानिया हॉस्पीटल या ठिकाणी फिव्हरसाठी स्क्रिनिंग व उपचारासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
नॉन कोव्हीड रुग्णालये :
तसेच कोव्हीड १९ आजार वगळून अन्य इतर नॉन कोव्हीड आजारांसाठी ज्युपिटर, हॉस्पीटल, जितो हॉस्पीटल, गोडबोले हॉस्पीटल, भागवत हॉस्पीटल, टायटन हॉस्पीटल, ऑस्कर हॉस्पीटल, मेट्रो हॉस्पीटल, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (मनपा) व इतर रुग्णालयांशी संपर्क साधावा. या शिवाय अधिक माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या 1800222108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
473 total views, 1 views today