ब्रिजलॅबचा अभियंत्यांकरिता ऑनलाइन कोडिंग बूट कॅम्प

सध्याच्या परिस्थितीत शिकाऊ विद्यार्थ्यांना बेसिक कोडिंग प्रोफिशिएन्सी लेव्हल गाठण्याचे कौशल्य या कॅम्पद्वारे शिकवले जात आहे.

मुंबई : उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात अभियांत्रिकीतील प्रतिभा आणि कल्पनेचे पोषण करण्याचा उद्देश असलेले देशातील सर्वात मोठे आयपी ड्रिव्हन इनक्युबेशन ब्रिजलॅब सोल्युशन्स एलएलपीने ‘कोडइनक्लब’ हा ३० दिवसांचा ऑनलाइन को़डिंग बुट कँप आयोजित केला आहे. भारतातील अभियंत्यांकरिता ३० दिवसांचा कॅम्प आयोजित करण्यात आला असून तो ३० एप्रिलपर्यंत चालेल. नुकतेच अभियंता झालेल्या विद्यार्थ्यांमधील प्रतिभा आणि उद्योगाशी निगडीत कौशल्ये यांतील फरक सांधण्याचा उद्देश असलेला हा कोर्स अभियंत्याला घरी बसून करता येत आहे. सध्याच्या परिस्थितीत शिकाऊ विद्यार्थ्यांना बेसिक कोडिंग प्रोफिशिएन्सी लेव्हल गाठण्याचे कौशल्य या कॅम्पद्वारे शिकवले जात आहे.

या कॅम्पसाठी ब्रिजलॅबतर्फे अत्यंत औपचारिक शुल्क आकारले जात आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी होतील. ब्रिजलॅबचे माजी विद्यार्थीदेखील यात सहभागी होत आहेत. ब्रिजलॅब फक्त या अभियंत्यांना नोकरीवर घेणा-या कंपन्यांकडूनच कमाई करते. तेदेखील या प्रतिभावंतांना नोकरी मिळाली तरच. त्यामुळे प्रतिभावंतांसाठी हे आउटकम ओरिएंटेड असणे हे कंपनीचे मूलभूत तत्त्व आहे.

मागील वर्षभरात कंपनीने वेगवेगळ्या ठिकाणी कोडिंग बूट कॅम्पची मालिका आयोजित केली. यात २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपासून मार्च महिन्यात १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कँपचा लाभ घेतला. यावेळी बूट कँपचे स्वरुप व्हर्चुअल असल्याने पुढील तीन महिन्यात ५ हजारांपेक्षा जास्त तसेच एप्रिल महिन्यात ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील, असा अंदाज आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी नोकरी सुरक्षित राहण्यासाठीची कौशल्ये शिकवली जात आहेत. त्यामुळे ऑनलाइन बूट कँपमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होत आहेत.

 396 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.