मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी नेले
मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य मंत्रिमंडळातील काही बेजबाबदार सदस्यांकडून नको त्या गोष्टींची उठाठेव केली जात आहे. सदर या मंत्र्यांमुळे त्यांच्याच सहकारी मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या अंडर ऑब्जर्व्हव्हेशन खाली जावे लागल्याची माहिती मंत्रालयातील प्रत्यक्षदर्शीने दिली.
राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री कोरोना निगेटीव्ह-पॉजीटीव्ह असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सतत सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सदर मंत्री मंत्रालयातील त्यांच्या सहकारी असलेल्या मंत्र्याच्या दालनात गेले होते. तेथे त्या मंत्र्याचे खाजगी सचिव आणि दोन जण उपस्थित होते. आता सदर मंत्र्यांना वैद्यकिय कारणास्तव ठाणे येथील फोर्टीस रूग्णालयात रात्रो ३ वाजता दाखल करण्यात आले. त्यामुळे सदर मंत्र्यांनी कोणकोणत्या ठिकाणी भेटी दिल्या, कोणाला भेटले याची संपूर्ण माहिती जमा करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
त्यावेळी सदर पोलिसांशी संबधित मंत्र्याच्या दालनात हे मंत्री गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्या दुसऱ्या मंत्र्यांच्या दालनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही खबरदारीचा उपाय म्हणून अंडर ऑब्जर्व्हवेशनखाली ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांची चाचणीही करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
तसेच फोर्टीसमध्ये दाखल असलेल्या मंत्र्याने मागील १०-१५ दिवसात कोण-कोणत्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या याचीही माहिती जमा करण्यात येत आहे.
524 total views, 2 views today