लॉकडाऊनमध्ये गणराज मित्र मंडळाची मदत

ठाणे : घोडबंदर भागातील मानपाडा शिवाजी नगर भागातील गोरगरीब नागरीकांना येथील गणराज मित्र मंडळांने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार येथील 1 हजार नागरीकांना तांदुळ, डाळ आणि तेलाचे वाटप करण्यात येत आहे.
मानपाडय़ातील गणराज मित्र मंडळ हे येथील सर्वात जुने मंडळ आहे. माघी गणोशोत्सवामध्येही या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु असतात. आता संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचा सावट पसरले आहे. त्यातून भारत देशही सुटु शकलेला नाही. मागील महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. तो येत्या 3 मे र्पयत असणार आहे. परंतु या कालावधीत हातावरचे पोट असणारे, गोरगरीब नागरीक, यांचे मात्र हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरातून या नागरीकांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्या अनुषंगाने आता या मंडळाच्या माध्यमातून देखील आता शिवाजी नगर भागातील तब्बल 1 हजार नागरीकांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार येथील प्रत्येक कुटुंबाला 2 किलो तांदूळ, एक किलो डाळ आणि एक लीटर तेल अशा स्वरुपाची मदत देऊ केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक सोनावले यांनी दिली. या कार्यात मंडळातील उपाध्यक्ष आनंद भोईर, विक्रम भिसे, सल्लागार गणोश शिंदे, हिरादास सोनावले, संजय सावंत, आबा भिसे, बालाजी गुंडाळे, कन्हैया नलगोंडा, विजय ढोरमले,ललित यादव आदींसह इतर थोरा मोठय़ांचे मोलाचे योगदान यात आहे. तर या कामी सवार्त मोलाची मदत मंडळाचे सल्लागार अजित मांडके तसेच त्यांचे सहकारी मंदार केणी यांचे सहकार्य लाभल्याचे सोनावले यांनी सांगितले.

 343 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.