नगरसेवक नजीब मुल्ला यांच्याकडून लाॅकडाऊनमध्ये सर्वधर्मियांना रमजानची अनोखी भेट

सर्वच धर्मियांना देणार जीवनावश्यक वस्तू


ठाणे : आपल्याकडे असलेल्या पुंजीतून गोरगरीब जनतेला, अडचणीत आलेल्या जनतेला,शेजाऱ्याला साह्य करावे; हे साह्य करीत असताना जातीधर्माचे बंधन पाळू नये; सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना मदत करावी, अशी इस्लाम धर्माची शिकवण आहे. या शिकवणीला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी लाॅकडाऊनमुळे गरजवंत झालेल्या जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे व्रत स्वीकारले आहे. लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात विविध जाती धर्माच्या सुमारे ६ हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असतानाच आता रोजा सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नजीब मुल्ला हे करणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात हे वाटप मुस्लीम बांधवांना तर दुसर्या टप्प्यात राबोडीतील सर्वच नागरिकांना करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने रमजानच्या पाक महिन्यात पवित्र काम मुल्ला यांनी हाती घेतले असल्याने त्यांना हजारो लोक दुवा देत आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवसाय बंद आहेत.नागरिकांनी घरातच बसूनच हा सण साजरा करावा, असे आवाहन सरकारने केले आहे. येत्या २४ एप्रिल पासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. या रमजान काळात रोजा सोडण्यासाठी नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे पाकिट नगरसेवक नजीब मुल्ला यांनी तयार केली असून राबोडीमधील हिंदू,मुस्लीम, ख्रिश्चन,बौद्ध समाजातील नागरिकांना याचे वाटप करण्यात करण्यात येणार आहे.
यासंदर्भात नजीब मुल्ला यांनी सांगितले की, सामान्य माणसांची लाॅकडाऊनमुळे नाकेबंदी झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला सुमारे सहा हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. आता या रमजानच्या काळात रोजा सोडताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी रोज सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या सरबत,खजूर,मसाले,कांदे, बटाटे, तेल,डाळ,साखर,बेसन पीठ अशा वस्तू देण्यात येणार आहेत. त्याचे सॅनिटाईज केलेली पाकिटे तयार करण्यात आली आहेत. ही पाकिटे सुमारे साडेसात हजार कुटुंबियांना पुरविण्यात येणार आहेत. राबोडी हा परिसर सर्वधर्मसमभाव जपणारा आहे. येथे रमजान महिना जसा साजरा होत असतो; तशीच दिवाळीही साजरी होत असते. त्यामुळे ही पाकिटे मुस्लीम बांधवांनाच नव्हे तर सर्वच धर्मियांना देण्यात येणार आहेत

 353 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.