शिफारस आणि हमीपत्र आवश्यक

राज्यशासनाची मार्गदर्शक तत्वप्रणालीनुसार दोन्ही कागदपत्रे असल्यावरच होणार कोव्हीड १९ चाचणी

ठाणे : राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वप्रणालीनुसार कोणत्याही नागरिकांस कोव्हीड-१९ चाचणी करण्यासाठी कोव्हीड-१९ सदृष्य लक्षणे असल्याचे सक्षम डॅाक्टारांचे शिफारसपत्र आणि चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत स्वतःहून विलगीकरणाचे नियम पाळणार असल्याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात आयसीएमआरने प्राधिकृत केलेल्या खासगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून कोव्हीड-१९ ची चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि ही चाचणी करण्यासाठी महापालिकेच्या ताप बाह्यरूग्ण केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी किंवा सक्षम वैद्यकिय व्यावसायिक यांचे संबंधित व्यक्तींस कोव्हीड सदृष्य लक्षणे असल्याबाबतचे शिफारसपत्र तसेच सदर चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत आपण नियमानुसार विलगीकरणाचे नियम पाळणार असल्याबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक राहणार आहे.
ही दोन कागदपत्रे सादर केल्यानंतरच कोव्हीड-१९ ची चाचणी होणार असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.