मी सतीश चाफेकर ..ज्यावेळी चेहरा नव्हता त्या वेळच्या आठवणी…3

साईटवरचे जीवन म्हणजे आपल्या व्हाईट कॉलरवाल्याना न परवडणारे जीवन, त्या जीवनाची ते काहीच बरोबरी करू शकणार नाहीत. तेथे संस्कृती , सभ्यपणा, ढोगीपणा , सो शायनींग काहीही टिकाव धरू शकत नाहीत. फक्त पैसा , मोबदला आणि काम करून आपली जागा स्थिर ठेवणे मुख्य म्हणजे ज्या कामाबद्दल पैसे मिळतात ते काम करणे, हे काम माझे नाही हे गर्वाने , गुर्मीने म्हणालात की तुमच्या करिअरला उतरंड लागली म्हणूनच समजावे. तो जे काम करू शकतो मग तू का नाही.माझे पण तसेच होते , साईटवरचे आयुष्य मुक्त होते, मी ते टिपर चालवणे,व्ह्यायब्रेटर कॉंक्रिट मिक्सर चालवणे , काँक्रीट मिक्सर चालवणे बरेच काही त्यावेळी वेळ असला की शिकत असे. मला आठवतंय त्यावेळी बेलापूरला काम मिळाले होते. बेलापूर गावातून जे एन पी टी कडे , उरण कडे जाणाऱ्या ब्रिज जे काम होते तो ब्रिज म्हणजे सगळ्यांना चॅलेंज होते कंपनीला आणि क्लायंटला कारण त्यावर गर्डर नव्हते कॉलम उभारून डायरेक्ट स्लॅब, त्याचे कॉलम पण अवाढव्य नाहीत बारीक फक्त त्यातील काँक्रीट आणि स्टील डिझाईन मात्र जबरदस्त वेगळे होते आणि ते चॅलेंजींग होते आमच्या कंपनीने ते स्वीकारले होते तेथे आमचे बॉस अनिल परुळकर असायचे . काँक्रेट बघणार मी , मार्गदशक परुळकर आणि डॉकटर पटेल . आमचा कॉंक्रिट डिझाईन मास्टर जो भारतात फेमस होता तो म्हणजे आर. रेमेडीओज . तो असे डिझाईन बनवायाचा की आमची हालत खराब व्हायची. तरीपण त्याला उलट उत्तर न देता आम्ही काम करून घेत असू. खूप किस्से आहेत इथे सांगता येणार नाहीत , एकदा तर मी त्याला जबरदस्त वात आणला होता, सतत BCMC करत शिव्या घालत होता, त्याला हवे ते घडत नव्हते आणि मी त्याला ते घडवूं देत नव्हतो, अगदी चुपचापपणे , परंतु एक मात्र खरे कॉंक्रिट डिझाईन मध्ये बाप होता.बेलापूरला गेल्यावर पहिल्याच दिवशी हैराण करणारी घटना घडली. आमची साईट रस्त्याच्या कडेला थोडी गावाबाहेर होती. संडास , बाथरूम अशा निरुपयोगी गोष्टी सुरवातीला नव्हत्या लागली तर सरळ पाण्याची बाटली घेऊन झाडीत जाऊन नैसर्गच्या सानिध्यात नैसर्गिक विधी उरकायचा , शांतपणे कामाला लागायचे. त्या दिवशी दुपारी ‘ धारानृत्य ‘ करण्याची वेळ आली तेव्हा , जरा लांब कोणी नाही असे बघून मी आणि माझा मित्र झाडाखाली गेलो, धारानृत्य करणार तेव्हा बाजूने जाणारा एक गावकरी शिवी हासडून म्हणाला अरे इथे मुतू नका तिथे लहान मुले मेली की पुरतात. झाले सगळा जाळ आतल्याआत निवाला. तेथून धूम ठोकली आणि दुसरीकडे धारानृत्य उरकले. आयला गावात कुठे काय करतात हे कसे कळणार निदान बोर्ड तरी असावा. मी माझ्या साहेबाला सांगितले तेव्हा त्यांनी पण मला मुर्खात काढले .अशा घटना होतच रहातात. सुरंगाने दगड फोडण्याचे काम चालू होते, ड्रिल करून भोक कसे पाडत त्यांत काळी काळी पावडर भरत , मग डेटोनेटर लावून जाळे कसे करत , हे सगळे बघत होतो. मग तो सुरंगाचे लायसन असणारा काळी पेटी घेईन यायचा , गोल गोल हॅण्डल बराच वेळ फिरवयाचा, सगळीकडे वॉचमन पांगापांग करत , वहाने अडवली जात, मग शिट्ट्यांचे आवाज आणि मग भूमकन आवाज करत मातीचा लोळ उठे पाठोपाठ दगडाच्या तुकड्याचा आवाज. एकदा खूप संध्याकाळ झाली होती, त्या काळ्या पेटीवाल्याने किती राउंड चावी मारली हे माहित नाही .दगडाचे तुकडे लांबवर पसरले, आणि गावातल्या इलेक्ट्रिकच्या तारांवर का कुठे पडले गावचे लाईट गेले, झाले गावकरी लाठ्या घेईन आले आम्ही सगळे गुल , सापडला तो स्टोअरचा मुख्य मग त्याने ते मॅटर शांत केले. असे अनेक अनुभव येणार होते आणि आम्हाला फेस करावयास लागणार होते त्या लाईफमध्ये धमाल होती ,रिस्क होते,मस्ती होती. परंतु यामध्ये माझा स्वाक्षरी घेण्याचा छंद जोरात चालू होता. हे महत्वाचे. जर काम नसेल तर कलती मारून अनेक कर्यक्रम जुबजुला होणारे अटेंड करावयाचो .पुढे काय काय घडणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती म्हणून स्वछंद्पणे नोकरी चालू होती, मुक्त लाईफ जगत होतो.त्यानंतर पुढे काय काय घडले ते सगणारच आहे…

सतीश चाफेकर

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.