बदलापुरात कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण

आठवड्याभरात रुग्णसंख्या १३ वर पोहोचली

बदलापूर : कोरोनाबाधित तीन रुग्णांच्या संपर्कात आल्याने बदलापूरातील ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल आली होती. त्यानंतर आज शुक्रवारी आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका आठवड्यात बदलापुर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.
आज बदलापुर शहरात दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यात एक शिरगाव तर दुसरा कात्रप भागात राहणार आहे. त्यापैकी एकजण मुंबईतील शासकीय रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता. तर दुसरा छातीत काहीतरी त्रास असल्याने ७ एप्रिलला सायन रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला होता. या दोघांनाही उपचारार्थ सध्या मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती बदलापूरचे उपमुख्याधिकारी दशरथ राठोड यांनी दिली.
गेल्या आठवड्यात बदलापूर पूर्व भागात एका ४५ वर्षीय महिलेला व तिच्या २० वर्षीय मुलीला तसेच बदलापूर पश्चिम भागात एका २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बदलापुरपालिका प्रशासनाने हे दोन्ही परिसर सील केले होते. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वांरटाईन केले होते. त्यांचे नमुने स्वॅप तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल गुरुवारी नगरपरिषदेला प्राप्त झाला. त्यामध्ये ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या आठ जणांना उपचारार्थ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज आणखी दोन रुग्ण बदलापूर पूर्व विभागात आढळले आहेत.
बदलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पालिका प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपापल्या घरात सुरक्षित रहावे आणि पालिका व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन बदलापूरचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

 406 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.