पनवेलमध्ये ५ तर श्रीवर्धनमध्ये १   असे सहा नवे रूग्ण आढळले

काळुंद्रे १, तक्का ३, कामोठेत १रुग्ण
 
  पनवेल : गेल्या दोन दिवसात स्थिर असलेल्या पनवेलने आज अचानक पाचच्या आकड्यासह उसळी घेतली.तर जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील एकासह आता सहा नव्या रूग्णांची भर पडली आहे,अशी माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी निर्भीड लेखशी बोलताना दिली.
  कालपर्यंत परदेश वारीहून आलेल्या नागरिकांभोवती कोरोना पिंगा घालत होता.आता त्याचा संसर्ग वाढल्याने तक्का येथील एका सरकारी धान्य दुकानदारासह ओला चालकाच्या संपर्कातील अन्य दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
  काळुंद्रे येथील औषधांच्या दुकानाचा प्रतिनिधी असलेली व्यक्ती भांडूप परिसरात ये-जा करीत असल्याने त्यालाही संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
  त्याशिवाय कामोठे येथील सेक्टर ३४ मधील एका व्यक्तीला कोरोनाने गाठल्याने कामोठे पुन्हा एकदा त्या चक्रात सापडले आहे.दरम्यान,श्रीवर्धनमधील एका व्यक्तीला कोरोना झाल्याने त्यालाही इथे दाखल करण्यात आले आहे.मुंबईतील वरळी येथून तो श्रीवर्धनच्या ग्रामीण भागात गेला होता.त्यालाही कोरोना झाला आहे.पनवेल येथे उपचार घेत असलेल्या कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा ३८ वर गेला आहे.
 
  नागरिकांनो,कोरोनाची शृंखला तोडा!
 
  कोरोनाची साखळी तोडणे नागरिकांनो,तुमच्या हाती आहे.अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा.अन्यथा घरीच थांबा.तुमच्यामुळे सोसायटीतील इतरांना त्याचा त्रास हो शकतो.तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना संसर्ग हो शकतो.त्यामुळे घरी बसूनच ही शृंखला तोडा,असे कळकळीचे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.

 594 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.