मदत पॅकेजच्या आशेने बाजारात सकारात्मक धारणा

बचाव पॅकेज मुख्यत: भारतीय एमएसएमईंसाठी असेल

मुंबई : सेन्सेक्स, निफ्टीने दोन दिवसांचा पडझडीचा कल मोडीत काढला. सेन्सेक्स ०.७३% नी म्हणजेच २२२ अंकांनी वाढला तर निफ्टीदेखील बंद होताना ०.७५% नी वाढलेला होता. एंजल ब्रोकिंगचे प्रमुख अमर देव सिंह यांनी सांगितले की आणखी एक मदतीचे पॅकेज मिळणार या आशेने आज बाजारात सकारात्मक धारणा होती. पॅकेजची घोषणा २० एप्रिलपर्यंत होण्याची अपेक्षा आहे. बचाव पॅकेज मुख्यत: भारतीय एमएसएमईंसाठी असेल. कारण लॉकडाउनमुळे त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये तेजी

२० एप्रिलपासून निर्बंधांमध्ये प्रस्तावित शिथिलतेसह मिड कॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्राला मदतीच्या पॅकेजच्या बातम्यांनी प्रोत्साहन मिळाले. निफ्टी स्मॉल कॅप-१०० आज २.८१% च्या वाढीसह बंद झाला. यात ७९ स्टॉक वृद्धीसह आणि केवळ २० घसरणीसह बंद झाले. अशोका बिल्डकॉन, जेएम फायनान्शिअल आणि कावेरी सीड्ससारख्या स्टॉक्समध्ये अनुक्रमे १८.४५%, १५.५५%, and १२.१९% वृद्धी दिसून आली. याच प्रकारे निफ्टी मिडकॅप-५०नेदेखील आज २.३४% च्या वृद्धीचा अनुभव घेतला. यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्यांमध्ये इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स, एलअँडटी फायनान्स होल्डिंग्स आणि एमअँडएम फायनान्शिअल यांचा समावेश होता.

ऊर्जा क्षेत्राची उत्कृष्ट कामगिरी

सध्या ऊर्जा क्षेत्रात सकारात्मक धारणा असून आजही तिचे दर्शन घडल्याचे अमर देव सिंह यांनी सांगितले. एसअँडपी बीएसई पावर इंडेक्समध्ये केईसी इंटरनॅशनल, एनटीपीसी, रिलायन्स इन्फ्रा आणि पावर ग्रिडसारखे स्टॉक अनुक्रमे ८.६८%, ५.८४%, ४.९४%, आणि २.३८% वृद्धीसह सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणा-यांमध्ये होते. अदानी ट्रान्समिळन, एबीबी इंडिया आणि टाटा पावरसारख्या शेअर्सवर दबाव दिसून आला. तो १ ते २ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

बँकिंग शेअर्सला लोकांची पसंती

बँकिंग क्षेत्राने चांगलीच गती पकडली. आज निफ्टी बँकेत केवळ दोन शेअर्समध्ये घसरण वगळता जवळपास सर्वच शेअर्सनी क्लीन स्वीप अनुभवले. आयडीएफसी फर्स्ट बँक, बंधन बँक आणि आयसीआयसीआय बँक ६.८६%, ६.१०%, व ४.४८% वृद्धीसह टॉप गेनर्समध्ये होते. एसबीआय, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँकसारख्या इतर बँकिंग कंपन्यांमध्येही १.९% ते ३.३७%ची वृद्धी दिसली. निफ्टी बँक केवळ दोन शेअर्स घसरले. पीएनबीची घसरण झाली तसेच कोटक बँक ३.६५% घसरणीवर बंद झाली. हा ट्रेंड सरकारच्या संभाव्य प्रोत्साहन पॅकेजवर अवलंबून असू शकतो. यात एक मोठा भाग वित्तीय धोरणांवर अवलंबून आहे.

 529 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.