डॉक्टरांना पुरवणार जादा २०० पीपीई संच
अंबरनाथ : येथील अॅक्मा सीईटीपी समूहातील उद्योजक संघटनेने ‘करोना’संकटात रुग्णसेवा देणारे आरोग्य सेवक आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने बुधवारी शहरात खाजगी वैद्याकीय व्यावसायिकांच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या पालिकेच्या बाह्यरुग्ण तपासणी केंद्रात काम करणारे डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेसाठी शंभर पीपीई संच ( पर्सपन प्रोटेक्शन इक्विपमेंट) भेट दिले. आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उद्योजिका रूपा देसाई जगताप आदी यावेळी उपस्थित होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या मदतीसाठी आणखी २०० पीपीई संच उद्योजक देणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
याशिवाय संस्थेने निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारे सॅनिटायझर्सही देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील हाफकिन इस्स्ट्यिूटमध्ये संस्थेने दोन हजार लिटर्स सॅनिटायझर दिले. याशिवाय अंबरनाथमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५०० लिटर्स सॅनिटायझर दिले. अॅक्मा सीईटीपी समूह उद्योजक संघटनेचे विलास देसाई, आरएल कंपनीचे संचालक सत्यपाल गुप्ता आदींनी ही मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
568 total views, 1 views today