हॅाटेल प्रिन्स आयसोलेशनसाठी अधिगृहित

महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला निर्णय

ठाणे : ठाणे शहरात कोव्हीड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज स्टेशन रोड येथील प्रिन्स हॅाटेल हे लक्षणे दिसून येत नसलेल्या कोरोना बाधीत रूग्णांसाठी आयसोलेशन सेंटर म्हणून अधिगृहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका आयुक्त सिंघल यांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदी तसेच महाराष्ट्र कोव्हीड -१९ उपाययोजना नियम २०२० मधील अधिकाराचा वापर करून सदरचे हॅाटेल तेथील सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्याचा निर्णय घेतला असून पुढील २४ तासात सदर हॅाटेल आयसोलेशन सेंटर म्हणून कोव्हीड बाधित रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशामुळे आता या हॅाटेलमध्ये कोव्हीड १९ च्या संदर्भात कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी वगळता अन्य व्क्तींना खोल्या तसेच अन्य कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे सदर हॅाटेल व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी कोव्हीड-१९ संसर्ग होवू नये यासाठी शासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
हॅाटेल व्यवस्थापनाने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूद्ध साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० तसेच भारतीय दंड संहिता (४५ ॲाफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई कण्यात येईल असा ईशाराही महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.

  

 571 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.