बिरूपक्ष मिश्रा कॉर्पोरेशन बँकेचे कार्यकारी संचालक होते.
मुंबई : बिरुपक्ष मिश्रा यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी बिरुपक्ष मिश्रा हे कॉर्पोरेशन बँकेचे कार्यकारी संचालक होते. बिरुपक्ष मिश्रा हे पदव्युत्तर आणि भारतीय बँकर्स संस्था (सीएआयआयबी)चे प्रमाणित सहकारी आहेत. त्यांनी १९८४ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून बँकिंग कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांना विविध शाखा, विभागीय कार्यालये आमि कॉर्पोरेट कार्यालयांत प्रशासकीय आणि इतर कार्यकुशलतेचा ३५ वर्षांहून जास्त अनुभव आहे. त्यांनी देशातील विविध भागांमध्ये काम केले असून बँकेचे क्रेडिट आणि क्रेडिट मॉनिटरिंग पोर्टफोलिओ हाताळले आहे. बँकेच्या आयटी व्हर्टिकलचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे.
537 total views, 2 views today