पुण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या नर्सला कोरोना

रूबीतील त्याच शिफ्टमधील ३० नर्सना केले क्वारंटाइन

पुणे : रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाच्या मुख्य परिचारिकेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आणखी ३० परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित परिचारिकेला दोन दिवसांपूर्वीच ताप आला होता. तिची वैद्यकीय तपासणी केली असता, कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ही परिचारिका ५० वर्षीय असून, तिच्यावर रुबीमध्येच उपचार करण्यात येत आहेत. तिच्यासोबत काम करणाऱ्या आणखी ३० परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
‘सुमारे तीस परिचारिकांना क्वारंटाइन केले आहे. त्यांच्यापैकी काही मुख्य परिचारिकेच्या संपर्कात आल्याने त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. करोनाचा संसर्ग झालेल्या परिचारिकेचा थेट रुग्णांशी संपर्क नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. इतर परिचारिकांना क्वारंटाइन केले आहे, असे रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे यांनी सांगितले.

 548 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.