मत्स्यप्रेमींसाठी खुशखबर !

मासेमारी आणि विक्रीसाठी कोळीबांधवांना परवानगी

सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे शासनाचे निर्देश

नवी दिल्ली : करोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात आवश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने करोनाचा धोका वाढू नये म्हणून मच्छीमारी, त्याची विक्री आदींवर बंदी घातली होती. आता शनिवारी केंद्र सरकारने मासे खाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. लॉकडाउनमुळे मासे खाण्यास न मिळालेल्यांना आता पुन्हा एकदा ताव मारता येईल. 
लॉकडाउनच्या काळात मासे पकडणे, त्याची विक्री, प्रक्रिया, वाहतूक आदींना सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील एक पत्रक केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार २४ मार्च रोजी गृह मंत्रालयाने लॉकडाउन जाहीर केले होते. त्यात आज पाचवी सुधारणा करण्यात आली. यानुसार लॉकडाऊनच्या काळात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध केले. मासेमारी संदर्भातील सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. यात तलावात चारा टाकने, मासे पकडने, त्यावर प्रक्रिया, वाहतूक आणि विक्रीचा समावेश आहे. लॉकडाउनच्या काळात बीज निर्मितीवर बंदी घातली होती. ती देखील या आदेशानुसार उठवण्यात आली आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच गेल्या काही दिवासांपासून लॉकडाउमुळे मासे खाण्यास न मिळालेल्या खवय्यांना देखील यापुढे बाजारपेठेत मासे मिळतील. 
केंद्राने मासे पकडण्यास आणि विक्रीस परवानगी दिली असली तरी यासंदर्भात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. मासे विक्री करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे केंद्राने या आदेशात स्पष्ट केले आहे.

 599 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.