तब्बल ६०० टन धान्याचे गरजूंना वितरण

आमदार गणेश नाईक यांचा मदतीचा हात

नवी मुंबई : कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे उद्योग आणि व्यवसाय ठप्प झालेले आहेत. याचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असलेले मजूर , गरीब कष्टकरी आणि गरजूंना बसला आहे. रोजीरोटी बंद झाल्याने काम आणि कमाई नाही त्यामुळे दोन वेळचं पोट कसं भरायचं, याची भ्रांत या समाजबांधवांसमोर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या कठीण काळात गरजू नागरिकांसाठी आमदार गणेश नाईक धावून आल्याचे दिसून येते. त्यांनी या समाज बांधवांना धान्यरुपी मदतीचा हात देऊ केला आहे. एकूण ६०० टन धान्य गरीब आणि गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. नवी मुंबईतील सर्व प्रभागांमधील गरजूंना धान्य वितरित केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. परंतु हे धान्य वितरित करताना नागरिकांना एका ठिकाणी न बोलावता सोशल डिस्टन्ससिंगचे काटेकोरपणे पालन करून गरजू नागरिकांच्या घरोघरी ते धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवावे अशी सूचना देखील आमदार गणेश नाईक यांनी दिल्याचे समजते.  त्याच बरोबर ज्या -ज्या व्यक्ती आणि संस्थांना शक्य आहे त्यांनी गरीब आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा दिलासा देण्याचे आवाहन देखील आमदार गणेश नाईक यांनी केले आहे.

 492 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.