जिंदाल कंपनीचे वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबाना सहकार्य
ठाणे : शहापूर तालुक्यातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबातील स्तनदा माता, गरोदर माता तसेच सहा वर्षा पर्यन्तचे बालकांना मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या आदेशाने जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग आणि जिंदाल कँपनीच्या संयुक्तपणे तयार खिचडी भात ( प्रि.मिक्स स्वरूपात) वाटप करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे वीटभट्टी कामकाज बंद आहेत, वीटभट्टीवरील कुटुंबातील स्तनदा माता, गरोदर माता तसेच सहा वर्षा पर्यन्तचे बालकांना पूरक पोषण आहार मिळावा यासाठी शहापूरच्या ९५० कुटुंबांना ४ टन खाद्य वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबासाठी साधारण ४ किलो खिचडीभाताचे पॅकेट वाटप केला जात आहे.
रेडी टू इट स्वरूपातील अन्नधान्य असल्याने दिलेला अन्न केवळ उकडायचे आहे. या काळात माता- बालकांना पूरक पोषण मिळणे आवश्यक असून जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहानाला जिंदाल कंपनीने उत्तम प्रतिसाद देत, सामाजिक उत्तरदायित्वच्या ( CSR) माध्यमातून हे
धान्य वाटप करण्याचा पुढाकार घेतला आहे. शहापुर प्रमाणे जिल्हयाच्या इतर तालुक्यात देखील अशाप्रकारे पूरक आहार देण्यासाठी इतर कम्पन्याशी संपर्क केला जात आहे
आज स्वतः जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी जिंदालचे विद्या गोरक्षकर, शकील शेख यांच्यासह शहापूर दौरा करत हे खाद्य वाटप केले.
609 total views, 1 views today