मागील २४ तासात १४ नवे रुग्ण सापडले
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात १४ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची सेंच्युरी पूर्ण झाली असून हा आकडा आता १०५ इतका झाला आहे. ठाणे शहरात चार, कल्याणमध्ये सहा आणि मीरा भाईंदरमध्ये चार अशा १४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, कोरोनाची लागण झळवल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप भिवंडीत एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे याच आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. जीव गमावणाऱ्या रुग्णांमध्ये नवी मुंबईत दोन, ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट गडद होत आहे. उल्हानगर महापालिका क्षेत्रात एक आणि ठाणे ग्रामीणमध्ये तीन करोनाबाधित रुग्ण आहेत. दरम्यान, भिवंडी तालुक्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
576 total views, 1 views today