अड्डा२४७ची विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाईन अभ्यास सामग्री सुविधा

विनामूल्य ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी शिक्षकांना आमंत्रण

मुंबई : सध्या देशभरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस लॉकडाऊनमुळे बंद आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशातील आघाडीचा तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंच अड्डा२४७ आपल्या ऑनलाइन व्यासपीठावर विद्यार्थ्यांना विनामूल्य अभ्यास सामग्री उपलब्ध करुन देत आहे. अड्डा२४७ ने ऑफलाइन प्रशिक्षण संस्थांच्या शिक्षकांनाही आपल्या मंचाच्या माध्यमातून विनामूल्य वर्ग देण्यासाठी आमंत्रित केले आहे.

अड्डा२४७ ने आपल्या मंचाच्या माध्यमातून बँक, एसएससी, अध्यापन, संरक्षण, पीसीएस इत्यादी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विविध कोचिंग संस्थांना ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच हा मंच विद्यार्थ्यांना अभ्यासाची सामग्री देखील विनामूल्य उपलब्ध करून देत आहे. या कठीण समयी ऑफलाईन शिकवणी केंद्रांना शैक्षणिक उपक्रमासाठी आपला मंच उपलब्ध करून देणारी या क्षेत्रातील ही एकमेव कंपनी आहे.

अड्डा२४७चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक अनिल नागर म्हणाले, ‘या कठीण समयी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून प्रयत्न करणे हे एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून मी आपले कर्तव्य समजतो. आमच्या मंचाच्या माध्यमातून विद्यार्थयांना विना अडथळा शिक्षण प्राप्त होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’

 408 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.