स्मृती मनधनालाही होमक्वारंटाईन

५ एप्रिल रोजी संपणार मुदत

सांगली : सांगलीची कन्या, भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला सांगलीत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन खबरदारी घेत आहे त्याचाच भाग म्हणून स्मृती मानधनाला होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र ताटे यांनी दिली.
स्मृती मानधना फेब्रुवारीमध्ये इंग्लंडमध्ये महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा खेळून आली होती, कोरोना ची साथ फैलावली त्यावेळी ती मुंबईत होती. राज्यभर संचारबंदी आणि लॉक डाऊन सुरू होताच २३ मार्चला सांगलीला घरी परतली २५ मार्च पासून तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रोज तिच्या घरी जाऊन विचारपूस केली जात आहे ५ एप्रिल रोजी तिच्या होम क्वारंटाईनची मुदत संपणार आहे.

 659 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.