पोलिसांसाठी धावून आला जलदूत

भाजप नगरसेवक सुनील सोनी यांची अखंड सेवा

अंबरनाथ : कोरोनाशी लढण्यासाठी वरचेवर हात स्वच्छ धुवावेत हे सर्व घरी रहाणार्या नागरिकांना सहज शक्य आहे. मात्र सतत रस्त्यावर सेवा देणाऱ्या पोलिसांना ते अशक्य आहे. हि बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील सोनी यांनी शहरातील बारा मुख्य चौकात हात धुण्यासाठी व पिण्यासाठी शुद्ध पाणी तसेच सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. गेली सात दिवस अहो रात्र हि सेवा अखंड सुरु आहे हे विशेष.
कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी सर्वानी घरी रहावे आणि वरचेवर हात धुवावे असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासन यासाठी कसोशीने पाठपुरावा करीत आहे. प्रत्येक चौकात त्यासाठी पोलीस तैनात आहेत. घरी असणाऱ्या नागरिकांना सतत हात धुणे सहज शक्य आहे. मात्र कायम सेवेत असणाऱ्या पोलिसांना वरचेवर सोडा किमान डबा खायच्या वेळेस हात धुण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाणी मिळेलच याची खात्री नाही मग सॅनिटायझर ची अपेक्षाच न केलेली बरी. या पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील सोनी अंबरनाथ शहरातील छत्रपती शिवाजी चौक, हुतात्मा चौक, स्वामी समर्थ चौक, शिवाजी नगर पोलीस ठाणे, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, वुलन चाळ, भाजी मार्केट, पालिका कार्यालय, फॉरेस्ट नाका, लादी नाका आदी बारा ठिकाणी पाणी, हॅंडवॊश, सॅनिटायझर ची व्यवस्था केली आहे.
केवळ उदघाटनापूर्ती व फोटो सेशन साठी हि व्यवस्था न करता गेली सात दिवस हि अखंड सेवा सुरु आहे. दर तासाला सुनील सोनी यांचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी जाऊन पाणी, सॅनिटायझरचे रिफिलिंग करीत आहेत. हे करीत असतांना त्यांच्या असे लक्षात आले कि शहरातील चार ठिकाणी पोलीस हे ऊन पावसात उभे असतात त्यांना बसण्यासाठी खुर्च्या नाहीत कि डोक्यावर छप्पर नाही. सुनील सोनी यांनी लगेच चार ठिकाणी मांडव घालून खुर्च्यांची व्यवस्थाही केली आहे. शहरातील बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची सेवा करताना आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी सुनील सोनी यांनी स्वतः फॉगिंग मशीन औषध फवारणी मशीन खरेदी करून वरचेवर प्रभागात औषध फवारणी करण्यात येत असते.
सुनील सोनीच्या रूपाने देव माणूस आमच्यासाठी धावून आला आहे. आम्ही सेवेत असतांना आम्हाला जशी आमच्या घरच्यांची काळजी असते तशी घरचेही आमची काळजी करीत असतात. घरच्यांना हि सुविधा उपलब्ध केलेली दाखवल्यावर घरच्यांनाही थोडा दिलासा मिळाला आहे. या पूर्वी आम्हाला डबा खातानाही धड पाणी मिळेल कि नाही अशी शंका वाटायची. मात्र आता वरचेवर आम्ही हातही धुवू शकतो आणि सॅनिटायझरमुळे आम्ही आणखी थोडे सुरक्षित झालो असल्याची बोलकी प्रतिक्रिया हुतात्मा चौकात सेवेत असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

 1,454 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.