ठाण्यात एका दिवसात पुन्हा दोन रुग्ण वाढले

शहरात कोरोनाचे १२ रुग्ण

    ठाणे  : ठाण्यात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण सापडले आहेत. वर्तकनगर भागात रहावयास असलेल्या पती पत्नीला ही लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२ झाली आहे. त्यामुळे ठाणेकर नागरीकांनी शक्यतो घरातच रहावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

मागील काही दिवसात शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानंतर तब्बल दोन आठवडय़ांनी रुग्णांच्या संख्येत प्रत्येक दिवशी वाढ होतांना दिसत आहे. कळव्यातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी एका दांपत्याला याचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दांपत्य १८ मार्च रोजी इंग्लंडवरुन आले होते. त्यानंतर २१ मार्च रोजी त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर २३ मार्च रोजी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता वर्तकनगर भागातील अन्य एका दांपत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दामप्त्य १५ मार्च रोजी अमेरिकेतुन आले होते. २१ मार्च रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आता त्यांचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आता शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली असल्याची माहिती पालिकेने दिली. कोरोना आता तिसऱ्या स्टेजला आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये आवाहन पालिकेने केले आहे.

 735 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.