लहानग्या प्रज्ञेशने जपली सामाजिक बांधिलकी


तीनशे गरजुंना अन्नधान्याचे वाटप करून वाढदिवस साजरा

अंबरनाथ : घरातच सुसंस्काराचे वातावरण असले कि ते लहान मुलातही निश्चित येत असतात. महाराष्ट्राची ती संस्काराची परंपरा आजही सूरु असल्याचे दर्शन अंबरनाथकरांना घडले. कोरोनामुळे सगळीकडे बिकट परिस्थिती पसरली आहे. सगळीकडे व्यवहार ठप्प झाले असल्याने गरीब व गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. अश्या परिस्थितीमध्ये प्रज्ञेश पाटील याने आपल्या वाढिदवसानिमित्त सुमारे ३०० गरजूना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि अंबरनाथ नगरपरिषदेतील काँग्रेसचे स्विकृत सदस्य पंकज सुभाष पाटील यांचा मुलगा प्रज्ञेश पाटील याचा आज वाढिदवस होता. दरवर्षी त्याचा वाढिदवस घरी धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र यावर्षी वाढदिवस नेहमीप्रमाणे साजरा करण्याऐवजी गरजुंना जीवनावश्यक वस्तू देण्याचा मानस प्रज्ञेश याने बोलून दाखवला होता. अवघ्या दहा वर्षांच्या प्रज्ञेशची ही इच्छा त्याच्या पालकांनीही तात्काळ उचलून धरली.
घरातच सामाजिक बांधिलकीचे वातवरण आहे. प्रज्ञेशचे आजोबा सुभाष पाटील हे केंद्र सरकारच्या आयुध निर्मणी कारखान्यातून निवृत्त झाले आहेत. सुभाष पाटील हे सेवेत असल्यापासून कामगार संघटनेत सक्रिय कार्यरत आहेत. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हूणन सुभाष पाटील यांचा शहरात परिचय आहे. माजी राज्यमंत्री नकुल पाटील यांच्या पासून ते आज काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पर्यंत सुभाष पाटील कार्यरत आहेत. कधीही पुढे पुढे न करता निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या पावलावर पाऊल ठेवून पंकज पाटील हे सुद्धा गेली दोन दशके समाजकार्यात पुढे आहेत. पक्षाशी निष्ठेने कार्य केल्यानेच काँग्रेस पक्षाने पंकज पाटील यांची २०१५ मध्ये अंबरनाथ पालिकेवर स्विकृत सदस्य म्हूणन निवड केली. आपली निवड पंकज पाटील यांनी सार्थ करून दाखवली आहे. पंकज पाटील हे अंबरनाथ तालुका पत्रकार परिषद या संघटनेचे गेली अनेक वर्षे अध्यक्ष आहेत. हि संस्था नोंदणीकृत असून या माध्यमातूनही पंकज पाटील हे सामाजिक व शैक्षणिक कार्यात पुढे असतात. घरातच हा समाजसेवेचा वारसा असल्याने त्यांचे संस्कार प्रज्ञेश यांच्यात उतरलेले आज पहावयास मिळाले.

प्रज्ञेशच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबरनाथच्या तहसिलदार कार्यालयाच्या परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील गरजुंना पाच किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, साखर, मुगडाळ, चहा पावडर, तेल, बिस्किटे अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रज्ञेश याच्या हस्ते करण्यात आले. ३०० जणांना धान्य वाटप करित असतांना गर्दी होऊ नये यासाठी देखील योग्य नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक १० कुटुंबांना १५ मिनिटांच्या फरकाने येण्यासाठी कुपन देऊन वेळ निश्चित करुन देण्यात आली होती. त्यांना त्यांच्या ठरलेल्या वेळेत धान्य वाटप करण्यात आले. त्यामुळे एकाचवेळी वाटपाच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.

 496 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.